
माधुरी दीक्षितने तिच्या लक्झरी वॉर्डरोबमध्ये आणखी एक पारंपारिक लेहेंगा सामील केला आहे. हा लेहेंगा पाहून कोणाच्याही नजरा खिळून राहू शकतात. अलीकडेच माधुरीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये माधुरी रेशीमी ‘टाय-डाय’ लेहंगा परिधान केलेली दिसली. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट करताना माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'Looking Back to You'.

माधुरीचा हा पोशाख डिझानर ब्रँड ‘रिती आर्नेजा’ने डिझाईन केला आहे. माधुरीने परिधान केलेला हा पेस्टल शेड लेहेंगा तुमचे मन नक्कीच जिंकून घेईल.

माधुरीने परिधान केलेल्या या ब्लॅक अॅन्ड व्हाईट लेहेंग्यावर सर्वत्र टाय-डायचे काम केले गेले आहे आणि जॅकेट स्टाईलमध्ये दिसत असलेल्या या ब्लाऊजवर भरतकाम केले आहे. या स्लीव्हलेस ब्लाऊजवर सेक्विन आणि थ्रेड भरतकामासह व्ही नेकलाइन डिझाईन केली आहे.

जर, आपण माधुरीच्या या लेहेंगाच्या किंमतीबद्दल विचार केला, तर या टाय-डाय रेशीम लेहेंग्यासाठी तुम्हाला तब्बल 53, 760 रुपये मोजावे लागतील.