
प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी...

अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक, कवियत्री अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. इतकाच नाही तर सोशल मीडियावर सुंदर फोटे शेअर करून ती चाहत्यांशी नेहमी कनेक्ट राहते.

नेहमीच सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे. नवनवीन फोटो शेअर करणाऱ्या प्राजक्तानं आता सुंदर ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

गुलाबी रंगाच्या सुंदर वेस्टर्न लेहंग्यामध्ये तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय, शिवाय तिचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरले आहेत.

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून, ती तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.