
आज जागतिक फादर्स डे आहे. त्यानिमित्त अनेकजणांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने एका मुलाखतीदरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पप्पांच्या गाडीचा आवाज आला की मी पुस्तक उघडून अभ्यासाला बसायचे. मी पप्पांचा खूप मार खाल्लाय. पण ते सगळं माझ्या जडण-घडणीसाठीच होतं, असं रिंकू म्हणाली.

आजही अकलूजमध्ये मला राजगुरू सरांची मुलगी म्हणूनच ओळखतात. पप्पांनी कायम मला सपोर्ट केलाय. ते म्हणतात की, तुला आवडतं ना... मग कर की... त्यांनी कधीही कोणती गोष्ट करण्यापासून मला रोखलं नाही, असं रिंकू म्हणाली.

कितीही मोठं झालो तरी आपण कुठून आलोय हे कधी विसरायचं नाही, असं माझे पप्पा मला सांगतात. ते मी कायम लक्षात ठेवलंय, असं रिंकू म्हणाली.

मी आज जे काही करू शकतेय ते माझ्या आई-बाबांमुळे त्यांच्याचमुळे मी इथपर्यंत पोहोचलेय. त्यांनी कायम मला सपोर्ट केलाय. पुढेही जे काही मिळवेन ते या दोघांमुळेच असेल, असंही रिंकूने म्हटलंय.