
अभिनेते नाना पाटेकर गेल्या काही दिवसांपासून एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. व्हिडीओमध्ये फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर मारताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण नाना पाटेकर यांचा विरोध करत आहेत

संबंधीत प्रकरणावर नाना पाटेकर यांनी स्पष्टिकरण देत माफी देखील मागितली. तर नाना पाटेकर यांच्या चाहत्याने देखील एक व्हिडीओ शेअर केला. फोटो काढण्यासाठी गेलो असताना नाना पाटेकर यांनी मारलं... असं चाहता व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

याआधी देखील नाना पाटेकर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलं होते. मी टू मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी मौन सोडलं. यामुळे अनेक पुरुषांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.

एवढंच नाही तर, 2019 मध्ये नाना पाटेकर RSS च्या रॅलीमध्ये दिसले होते. म्हणून देखील नाना पाटेकर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

2020 मध्ये देखील नाना पाटेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. नाना पाटेकर यांनी भारत सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध केला होता. म्हणून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती.