
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने पुन्हा एकदा लग्न केलं आहे.

अंकिताने प्रियकर विकी जैनशी डिसेंबर 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर या जोडीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.

ही जोडी स्टार प्लस वाहिनीवरील 'स्मार्ट जोडी' या रिअॅलिटी शोमध्ये नुकतीच झळकली. या शोचा एक भाग म्हणून आणि अंकिताच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न केलं.

यावेळी अंकिताने लाल आणि निळ्या रंगाची काठपदराची साडी परिधान केली होती. तर विकीने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली.

मुलीचं लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने व्हावं, अशी अंकिताच्या आईची इच्छा होती. ही इच्छा त्यांनी या शोमध्ये बोलून दाखवली.

अंकिताने या लग्नसोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.