
'धाकड' या आगामी चित्रपटाच्या शूटिंग अगोदर अर्जुन रामपाल आपल्या कुटुंबासोबत हंगरीच्या बुडापेस्टमध्ये सुट्टी घालताना दिसला. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि त्यांचा मुलगा एरिक देखील होता.

या दरम्यान त्यानं या ट्रीपचे काही फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. आपल्या आगामी चित्रपटाचं काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो हंगरीला पोहोचला.

नुकतंच अर्जून त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला होता.

त्याला अलिम हकीमच्या सैलूनमध्ये स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानं 'धाकड' या चित्रपटासाठी प्लॅटिनमचा ब्लॉन्ड लूक केला आहे. त्यानं आपला नवा लुक फ्लॉन्ट करत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

‘धाकड’ या चित्रपटात अर्जुन प्रतिद्वंद्वी रुद्रवीरची भूमिका साकारणार असून या चित्रपटात कंगना रनौत देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.