
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अलीकडेच जोधपूरला गेले आणि इथे आलियाने रणबीरचा वाढदिवस अतिशय रोमँटिक पद्धतीने साजरा केला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.

आता रणबीर आणि आलियाला जोधपूर विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यादरम्यान आलियाने ब्राऊन टँक टॉप आणि डेनिम जीन्ससह पांढरं जॅकेट परिधान केलं होतं.

दुसरीकडे, रणबीर काळ्या हुडीसह ग्रेडी रंगाच्या कार्गोमध्ये दिसला. दोघं एकत्र खूप छान दिसत होते.

या दरम्यान, दोघांना पाहून चाहत्यांची गर्दी झाली आणि रणबीरने आलियाला गर्दीतून तिचं संरक्षण करत बाहेर काढलं.

आलियाने रणबीरसोबत सूर्यास्ताचा आनंद घेतानाचा एक फोटो शेअर केला, तो शेअर करत तिने लिहिले, माझ्या आयुष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.