
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल येत्या 23 जून रोज कोर्ट मॅरेज करणार आहेत. दोघे बऱ्याच काळापासून एकमेकाला डेट करतायत. या दोघांआधी बऱ्याच कलाकारांनी कोर्ट मॅरेज केलय.

सैफ अली खानने अमृता सिंह पासून घटस्फोट घेतल्यानंतर करीना कपूर सोबत कोर्ट मॅरेज केलं. 2012 साली दोघांनी ऑफिशियली रजिस्टर्ड मॅरेज केलं.

स्वरा भास्कर सुद्धा आपल्या लग्नामुळे बरीच चर्चेत होती. तिने फहाद अहमद सोबत मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये कोर्ट मॅरेज केलं. दोघांना एक मुलगी आहे.

'चक दे इंडिया' फेम सागरिका घाटगेने झहीर खान सोबत लग्न केलं. दोघे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. 2017 साली त्यांनी कोर्ट मॅरेज केलं.

संजय दत्त आणि मान्यताने 2008 मध्ये कोर्ट मॅरेज केलं. संजय दत्तच हे तिसर लग्न आहे. दोघांनी आपल नातं बराच काळ फॅन्सपासून लपवून ठेवलं होतं.