
किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे.

सलमान खान याची झलक पठाण चित्रपटमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळाली. विशेष म्हणजे शाहरूख खान आणि सलमान खान यांची जोडी पाहून प्रेक्षकही आनंदी झाले.

आज संध्याकाळी सहा वाजता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज होतोय.

सलमान खान याने ट्रेलर रिलीज होण्याच्या अगोदर प्रेक्षकांने एक मोठे आणि खास गिफ्ट दिले आहे. सलमान खान याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एक जबरदस्त असे पोस्टर शेअर केले आहे.

सलमान खान याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याचा जबरदस्त लूक दिसतोय. विशेष म्हणजे पोस्टरमधील सलमान खान याचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.