
भोजपुरी क्विन अक्षरा सिंह तिच्या स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकत आहे. तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना खूप आवडतो. यामुळे लाखो लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.

अक्षरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात. तिने पुन्हा एकदा वेगवेगळ्या पोज देत फोटो शेअर केले आहेत.

अक्षराने पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अक्षरा एका फोन बूथजवळ उभी राहून पोज देताना दिसत आहे.

फोटो शेअर करताना अक्षरा ने लिहिले - आप बोले ना बोले .. मुझे पता है पिक्चर्स अच्छी आई हैं. फिर भी कुछ बोलना चाहें तो बोल दें.

हजारो चाहत्यांना अक्षराचे फोटो आवडले आहेत. चाहते खूप कमेंट्स देखील करत आहे. एका चाहत्यानं लिहिलं - खूप सुंदर दिसत आहे. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिलं - एक दम कडक.