
अभिनेत्री आमना शरीफचा आज म्हणजेच 16 जुलै रोजी वाढदिवस आहे. आमना बिनधास्त अभिनय आणि तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

आमनाने आपल्या करिअरची सुरूवात प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'कहीं तो होगा' पासून केली होती. इतकंच नाही तर ती 'आलू चाट', 'आओ विश करें' आणि 'एक विलेन' या चित्रपटांमध्ये सुद्धा झळकली आहे.

अभिनेत्री नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. आमना आपल्या स्टाईलनं चाहत्यांना वेड लावत असते.

तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तिनं 2013 साली निर्माता अमित कपूरसोबत लग्न केलं. तर लग्नाआधी टीव्ही अभिनेता राजीव खंडेलवालसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती.

दोघांनीही 'कहीं तो होगा' शोमध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्यानंतर दोघांचे संबंध जवळपास 3 वर्षे चालले. हे नातं बिघडण्यामागील कारण म्हणजे अभिनेता आफताब शिवदासानीसोबत आमनाचं अफेअर असल्याचं म्हटलं जातं.

आमना अखेर टीव्ही शो कसौटी जिंदगी की मध्ये दिसली होती.