
अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर हे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.

सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पत्नी मीरा आणि दोन मुलांसोबत शाहिद मुंबईतील आलिशान घरात राहतो.

शाहिदची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, मीरा राजपूतने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मीरा कायम तिच्या वैवाहिक आयुष्य आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.

शाहिद कितीही व्यस्त असला तरी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कुटुंबासोबत वेळ व्यतीत करताना दिसतो. शाहिदचे पत्नी आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत कपूर यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं. अनेक ठिकाणी शाहीद पत्नीची काळजी घेताना दिसतो. कुटुंबियांच्या इच्छेनुसार दोघांनी लग्न केलं.