
अभिनेत्री आलिया भट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने मागच्या काही दिवसांपासून करोडोंचा गल्ला जमवलाय.

अवघ्या सहा दिवसात गंगुबाई सिनेमाने 63.53 कोटींची कमाई केली आहे. काल दिवसभरात या सिनेमाने 6.5 कोटांची कमाई केली आहे.

अनेक ठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल झालेत. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड लागलेत.

ओटीटीवर येतोय आलियाचा 'गंगुबाई काठियावाडी'

संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा असल्याने भव्य सेट आणि श्रवणीय गाणी ही या सिनेमाची खासियत आहे.