
'शुद्ध देसी रोमान्स', 'बेफिक्रे', 'वॉर', 'शमशेरा', 'बेल बॉटम' अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री वाणी कपूर (Vani Kapoor) हिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री वाणी कपूर हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

फार कमी काळात वाणी कपूर हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत वाणीने स्क्रिन शेअर केली आहे.

वाणी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांचा आकडा फार मोठा आहे. सोशल मीडियावप वाणीचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. वाणीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.