
किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे सलमान खान हा चर्चेत आहे. सलमान खान याच्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री पूजा हेगडे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील अनेक गाणे रिलीज झाले आहेत.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. सलमान खान याला पूजा हेगडे ही डेट करत असल्याच्या देखील चर्चा आहेत. पूजा हेगडे की कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे.

पूजा हेगडे हिने चित्रपटांमधून तगडी कमाई केलीये. इतेकच नाही तर जाहिरातीमधूनही मोठी कमाई करते. इतकेच नाही तर मुंबईमध्ये आलिशान घर देखील पूजा हेगडे हिचे आहे.

पूजा हेगडे हिचे टोटल नेटवर्थ 55 कोटी असून मुंबईतील बांद्रा परिसरात तिचा आलिशान असा थ्री बीएचके फ्लॅट आहे. अत्यंत महागड्या गाड्या देखील पूजा हेगडे हिच्याकडे आहेत.

पूजा हेगडे हिने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. पहिल्यांदाच सलमान खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना पूजा दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.