
'हीरामंडी' स्टारर सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर स्वतःचे कायम फोटो पोस्ट करत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सीरिजमुळे चर्चेत आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी हिने खलनायकाची भूमिका पार पाडली आहे.

‘हीरामंडी’ सीरिजमधील अभिनेत्रीचे वेगवेगळे लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडले. सीरिजमध्ये ‘फरीदान’ भूमिकेला सोनाक्षी हिने न्याय दिला आहे.

अभिनेता सलमान खान स्टारर 'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये सोनाक्षी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करते. सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील सोनाक्षी कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.