
प्रसिद्ध अभिनेत्री आणि सिंगर शहनाझ गिल तिच्या क्यूटनेस आणि चुलबुल अंदाजासाठी ओळखली जाते. आता नव्या फोटोशूट्ससह तिनं चाहत्यांना भुरळ पाडली आहे. यावेळी तिनं हॉट अवतारातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्रान्सफॉर्मेशन झाल्यापासून शहनाज तिच्या किलर स्टाईलनं लोकांना सतत आश्चर्यचकित करते आहे. आता तिनं हे फोटो शेअर करत सोशल मीडियाचं तापमाण वाढवलं आहे.

'बिग बॉस 13' पासून शहनाज गिल लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या शोमधून तिला फक्त लोकप्रियता मिळाली नाही तर तिनं स्वत:वर भरपूर काम केलं आहे. आता सध्या ती नवनवीन गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सोबतच ती तिचे असे क्लासी फोटो शेअर करत चाहत्यांचं मन जिंकत आहे.

बॉलिवूडचे लोकप्रिय फोटोग्राफर डब्बू रत्नानी शहनाजचे एकामागून एक ग्लॅमरस फोटोशूट करत आहेत.

शहनाज गिल लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘हौसला रख’ या चित्रपटात दिसणार आहे. यासाठी शहनाजचे चाहते उत्सुक आहेत.