
आज संपूर्ण देशभरात ईद साजरी केली जात आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. बाॅलिवूडमध्येही ईदचा जोश बघायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिची यंदाची पहिली ईद आहे. यावेळी स्वरा भास्कर ही कुटुंबासोबत ईद साजरा करताना दिसली. ईदनिमित्त खास पोस्टही स्वरा भास्कर हिने शेअर केलीये.

देवोलीना भट्टाचार्जी हिने डिसेंबरमध्ये शहनवाज शेख याच्यासोबत लग्न केले. यंदा पहिली ईद देवोलीना हिची देखील आहे. शहनवाज शेख याच्यासोबत लग्न केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते.

देवोलीना हिने ईदच्या शुभेच्छा देत खास मुस्लिम आऊटफिट कॅरी केला आहे. सोशल मीडियावर तिने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देवोलीना हिची ही पोस्ट तूफान व्हायरल झाली.

स्वरा भास्कर हिने देखील ईदनिमित्त एक खास व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या दोघीही अभिनेत्रींची यंदा पहिली ईद आहे. दोघींचाही लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय.