Happy Birthday Amrita Puri | सुशांतसोबतच्या ‘काय पो चे’ने मिळवून दिली ओळख, वाचा कसा होता अमृता पुरीचा चित्रपट प्रवास…

| Updated on: Aug 20, 2021 | 8:05 AM

अभिनेत्री अमृता पुरी (Amrita Puri) हिच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती चित्रपट जगतातील नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार केला, तेव्हा तिचे वडील त्याला सहमत नव्हते. मात्र, अमृताचा पहिला चित्रपट 'आयशा' (2010) प्रदर्शित झाला, तेव्हा तिच्या वडिलांना खूप अभिमान वाटला.

1 / 5
अभिनेत्री अमृता पुरी (Amrita Puri) हिच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती चित्रपट जगतातील नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार केला, तेव्हा तिचे वडील त्याला सहमत नव्हते. मात्र, अमृताचा पहिला चित्रपट 'आयशा' (2010) प्रदर्शित झाला, तेव्हा तिच्या वडिलांना खूप अभिमान वाटला. 20 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या अमृता पुरीबद्दल अशाच काही खास गोष्टी जाणून घेऊया..

2 / 5
अमृता पुरीचे वडील आदित्य पुरी (Aditya Puri) हे एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. आपल्याला चित्रपटात काम करायला मिळावे, या गोष्टी वडिलांना पटवून देण्यासाठी तिला पूर्ण दोन वर्षे लागली. एका मुलाखतीत अमृता म्हणाली होती की, 'माझे वडील माझ्या विचाराशी सहमत नव्हते. मला खूप मेहनत करावी लागली. दोन वर्षांनी त्यांनी होकार दिला. तथापि, माझा पहिला चित्रपट रिलीज झाला तेव्हा माझे वडील खूप उत्सुक होते. त्यांना माझा अभिमान वाटत होता.’

3 / 5
मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वी अमृताने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिली. यानंतर, 2012 मध्ये तिचा 'ब्लड मनी' हा चित्रपट आला, जो फ्लॉप ठरला. 2013मध्ये अमृताला बॉलिवूडमध्ये 'काई पो चे'द्वारे मोठी ओळख मिळाली. तिच्या कारकिर्दीतील हा पहिला हिट चित्रपट होता. यानंतर, अमृता 'जजमेंटल है क्या'मध्ये (2019) दिसली. ती आगामी '83' या चित्रपटात दिसणार आहे.

4 / 5
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमृताने लिहायला आणि थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. एक वर्ष तिने एका जाहिरात एजन्सीसाठी लेखन सहाय्यक म्हणून काम केले. त्याच वेळी तिने चित्रपट आणि जाहिरातींसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. लवकरच तिला निकोटेक्सची जाहिरात मिळाली. त्यानंतर तिने पीपल फर्स्ट, गार्नियर आणि लॉरियलसह इतर मोठ्या कंपन्यांसाठी जाहिराती केल्या.

5 / 5
2015 मध्ये अमृता पुरीने टीव्हीच्या जगात पाऊल ठेवले आणि 'स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर' या सीरीजमध्ये काम केले. याशिवाय तिने 'PoW - Bandi Yudh Ke' मध्ये काम केले. अमृताने 'फोर मोअर शॉट्स प्लीज' आणि 'मेड इन हेवन' या वेब सीरीजमध्येही काम केले आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, 2017मध्ये अमृताने मुंबईस्थित रेस्टॉरंट मालक इमरुन सेठीशी लग्न केले होते. मात्र, गत वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या नात्यात बिनसल्याचे वृत्त आले आणि घटस्फोटाच्या चर्चा देखील झाल्या.