
मल्याळम चित्रपटांचे ज्येष्ठ अभिनेते मामुट्टी (Mammootty) रसिकांच्या हृदयावर राज्य करतात. आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी अभिनेता त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय सादर करून मामुट्टीने प्रत्येकाला स्वतःबद्दल वेडे केले आहे.

मामुट्टीचा जन्म 7 सप्टेंबर 1951 रोजी झाला. या अभिनेत्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मल्याळम व्यतिरिक्त, अभिनेत्याने तमिळ, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये अभिनयामध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे.

मामुट्टी यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. एका वर्षात 35 चित्रपट प्रदर्शित करण्याचा विक्रम या अभिनेत्याच्या नावावर आहे.

अभिनेत्याच्या चाहत्यांना क्वचितच माहित असेल, एक हुशार अभिनेता असण्याव्यतिरिक्त, ते एक वकील देखील आहे. अभिनेत्याला वाहनांची विशेष आवड आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या बहुतेक कारचा क्रमांक 369 आहे. यामध्ये सर्वात स्वस्त ते सर्वात महागड्या कार्सचा देखील समावेश आहे.

मामुट्टी देखील वादात अडकले आहेत. 2015 मध्ये, फेअरनेस साबणाची जाहिरात केल्यामुळे ते वादात सापडले होते.