
वादग्रस्त अभिनेत्री पायल रोहतगीचा (Payal Rohatgi) जन्म 9 नोव्हेंबर 1984 रोजी हैदराबादमध्ये झाला. इंजिनीअरिंग केल्यानंतर ती फिल्मी दुनियेकडे वळली. पायलने मॉडेलिंगच्या जगातही खूप नाव कमावले. ती बिग बॉसचा भाग देखील होती. चला तर, पायल रोहतगीच्या वाढदिवशी जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही मनोरंजक गोष्टी...

पायल रोहतगीने त्याच वर्षी ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला होता ज्यामध्ये प्रियंका चोप्रा आणि दिया मिर्झा सारख्या अभिनेत्रींनी भाग घेतला होता. पायलने ‘मिस टुरिझम वर्ल्ड’मध्येही भाग घेतला आणि तिथे तिने ‘सुपर मॉडेल’चा किताबही जिंकला.

पायलने अनेक जाहिरातींमध्ये आणि म्युझिक व्हिडींओमध्येही अभिनय केला आहे. यानंतर पायल बॉलिवूडकडे वळली आणि 2006 मध्ये ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 2008 मध्ये पायल ‘बिग बॉस’च्या 9व्या सीझनमध्ये दिसली होती. पायल आणि राहुल महाजन यांची बिग बॉसमध्ये घट्ट मैत्री झाली होती. मात्र, नंतर काही गोष्टीवरून दोघांमध्ये मतभेद झाले. 2010 मध्ये पायलने राहुल महाजनवर मारहाणीचा आरोप केला आणि त्याने तिला अनेकदा मारहाण केल्याचे देखील सांगितले.

पायलने राहुलने तिचे डोके भिंतीवर आपटल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याचे डोके फुटून खूप रक्त वाहिले होते. पायलने असेही सांगितले की, एकदा राहुलने फोन न उचलल्याने तिला मारहाण केली होती. तिने म्हटले होते की, जेव्हा राहुल रागावतो तेव्हा तो खूप धोकादायक बनतो. आता पायलने संग्राम सिंहसोबत लग्न केले आहे आणि ती अनेकदा आपल्या ट्विटद्वारे चर्चेत असते.

पायल रोहतगीचे नाव आणखी अनेक वादात सापडले आहे. 2019 मध्ये पायल रोहतगीने दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली होती. यानंतर राजस्थान पोलिसांनी तिला अटक केली होती. पायलने जामिया मिलिया इस्लामियाची एमफिल विद्यार्थिनी सफूरा जरगर हिच्यावर टिप्पणी केली होती. यानंतर तिचे खाते सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते.