Shruti Marathe : श्रुती मराठेचा हटके ‘बॉर्बी डॉल’ लूक पाहिला का?; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…

| Updated on: Sep 01, 2021 | 12:52 PM

नेटच्या सुंदर ड्रेसमध्ये श्रुतीनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत. (Have you seen Shruti Marathe's 'Barbie Doll' look?; see these beautiful pictures)

1 / 5
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘राधा’ अर्थात अभिनेत्री श्रुती मराठे (Actress Shruti Marathe) ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आता श्रुतीनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय. या नव्या फोटोशूटमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 5
नेटच्या सुंदर ड्रेसमध्ये श्रुतीनं हे फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.

4 / 5
अभिनेत्री श्रुती मराठेचा जन्म बडोद्याचा. मात्र, त्यानंतर तिचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. पुण्याच्याच शाळेत श्रुतीचं शिक्षण झालं. शाळेत असल्यापासूनच श्रुतीला अभिनय आणि खेळाची प्रचंड आवड होती. दहावीत असताना तिला पहिल्यांदाच अभिनय करण्याची संधी मिळाली. ‘पेशवाई’ या मालिकेतून तिने अभिनय विश्वात पदार्पण केले होते. पुढे महाविद्यालयीन जीवनात तिने शिकत असतानाच, नाटकातून काम करायचे ठरवले .

5 / 5
श्रुती मराठेने ‘सनई-चौघडे’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले. तिची या चित्रपटातील छोटीशी भूमिका देखील चाहत्यांच्या लक्षात राहिली. यानंतर श्रुती अनेक मराठी चित्रपटात झळकू लागली. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ या मधून तिला खरी ओळख मिळाली.