
‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पती तीर्थदीप रॉयसोबत सई लोकूर भटकंती करत आहे.

सई आता तीर्थदीपसोबत मालदीवला पोहोचली आहे. मालदीवची सफर करत ती प्रचंड धमाल करतेय.

सोशल मीडियावर सक्रीय असणारी सई रोज फोटो शेअर करत आपल्या भ्रमंतीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते आहे.

नुकतेच तिने समुद्र किनारी धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सई पती तिर्थदीप रॉयसोबत कपल गोल्स देताना दिसत आहे.

लग्न झाल्यापासून सई चाहत्यांना परफेक्ट कपल गोल्स देत आहे. दोघंही आपले फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असतात.