
बॉलिवूडचा टॅलेंटेड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याला तुम्ही आतापर्यंत चित्रपटांमध्ये अनेक स्टंट करताना पाहिले असेल. पण, आता विकी खऱ्या आयुष्यात कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. वास्तविक, विकी बेअर ग्रील्ससोबत दिसणार आहे.

विकी बेअर ग्रिल्सच्या शो ‘इनटू द वाईल्ड’मध्ये दिसणार आहे. शोचे पोस्टर शेअर करताना विकीने लिहिले की, ‘बेअर ग्रिल्ससोबत एक लाइफटाईम अॅडव्हेंचर. त्यांनी माझ्यासाठी काय योजना आखल्या आहेत ते पाहूया.’

‘इनटू द वाईल्ड’चा विकी कौशल स्पेशल एपिसोड 12 नोव्हेंबरला डिस्कव्हरी प्लस इनवर प्रदर्शित होईल. विकी आणि बेअरला एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत.

अभिनेता विकी कौशल मागील काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विकी आणि कतरिना लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, या वृत्तांवर दोन्हीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विकीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर तो ‘सॅम बहादूर’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच त्याचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.