AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्ध लांबले तरी, या देशांना पेट्रोल-डिझेलची नाही चिंता, इतका आहे रिझर्व्ह साठा

इराणवर २८ फेब्रुवारी रोजी इस्राई-अमेरिकेने हल्ला केल्यानंतर जगात इंधनाचे संकट तयार झाले आहे. अनेक देशात इंधनाची आणि गॅसची टंचाईच्या झळा बसत आहेत, मात्र काही बड्या देशांकडे इंधनाचा राखीव साठा असल्याने या देशांना युद्ध लांबले तरी फारसा फरक पडत नाही. हे देश कोणते ?

इराण युद्ध लांबले तरी, या देशांना पेट्रोल-डिझेलची नाही चिंता, इतका आहे रिझर्व्ह साठा
Strategic Oil Reserve
| Updated on: Mar 12, 2026 | 3:45 PM
Share

Strategic Oil Reserve: पश्चिम आशियातील इराण युद्धामुळे जगभरात इंधनाचे संकट तयार झाले आहे. अनेक देशात पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. जगातील अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी कच्च्या तेलावर अवलंबून आहे. जेव्हा युद्धाचे संकट निर्माण होते तेव्हा जर इंधनाचे साठे असणाऱ्या देशात युद्ध लढले गेले तर याचा थेट परिणाम इंधनावर अवलंबून असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर होतो. अशा परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अनेक देश स्ट्रेटजिक ऑईल रिझर्व्ह कायम ठेवतात, ज्याचा उपयोग अशा वेळी होऊ शकतो. सध्या अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठा स्ट्रेटजिक ऑईल रिझर्व्ह आहे.

अमेरिकेच्या जवळ सर्वात मोठा राखीव तेल साठा

स्ट्रेटजिक ऑईल रिझर्व्हच्या बाबतीत अमेरिकेचा नंबर पहिला आहे. अमेरिकेच्या जवळ सुमारे ७०० दशलक्ष बॅरल क्षमतेचा ऑईल रिझर्व्ह आहे. हा जगातला सर्वात मोठा सरकारी तेल रिझर्व्ह मानला जातो. या इंधनाला स्पेशल अंडरग्राऊंड रिझर्व्हमध्ये ठेवले जाते, म्हणजे गरज लागेल तेव्हा याचा वापर केला जातो. एनर्जी संकट वा ग्लोबल पुरवठ्यात कमतरतेच्या वेळी अमेरिका अनेकवेळा या रिझर्व्ह कोट्यातून तेल बाहेर काढत असतो.

चीन आणि जपान देखील मोठा राखील तेल साठा असणारे देश

आशियात चीन आणि जपान या देशांकडेही मोठा स्ट्रेटजिक तेल रिझर्व्ह आहे. चीनच्या जवळ सुमारे ४०० ते ५०० दशलक्ष बॅरल पर्यंत तेल रिझर्व्ह असण्याचा अंदाज आहे. जपानच्या जवळ सरकारी आणि खाजगी राखीव साठा मिळून सुमारे ४४० दशलक्ष बॅरलच्या आसपास तेल स्टॉक आहे. या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मोठी आहे. यांचा तेल आयातीवर अवलंबित्व अधिक असल्याने या देशांनी राखीव तेलसाठी तयार करुन ठेवले आहेत.

रँकदेशअंदाजित स्ट्रेटजिक ऑईल रिझर्व्ह
1अमेरिका सुमारे 700 मिलियन बॅरल क्षमता
2चीनसुमारे 400 से 500 मिलियन बॅरल
3जपानसुमारे 440 मिलियन बॅरल सरकारी आणि खाजगी स्टॉक
4दक्षिण कोरियासुमारे 200 मिलियन बॅरल
5जर्मनी सुमारे 170 मिलियन बॅरल
6फ्रान्ससुमारे 120 मिलियन बॅरल
7इटली सुमारे 76 मिलियन बॅरल
8ब्रिटनसुमारे 60 ते 70 मिलियन बॅरल
9भारत5.33 मिलियन मेट्रिक टन
10स्पेनसुमारे 30 ते 50 मिलियन बॅरल

सोर्स– International Energy Agency, U.S. Energy Information Administration,Energy Institute Statistical Review

दक्षिण कोरिया आणि यूरोपतही मोठे राखीव तेलसाठे

दक्षिण कोरियाच्या जवळ सुमारे २०० दशलक्ष बॅरलचे तेल राखीव आहे. याशिवाय युरोपातील अनेक देशात देखील एनर्जी सिक्युरिटीसाठी मोठे राखीव साठे बाळगतात. जर्मनीच्या जवळ सुमारे १७० दशलक्ष बॅरल तेल स्टॉक आहे. फ्रान्सच्या जवळ सुमारे १२० दशलक्ष बॅरल आणि इटलीच्या जवळ सुमारे ७६ दशलक्ष बॅरल इंधन राखीव आहे.

भारतासह अनेक देश तेल रिझर्व्ह वाढवाहेत..

भारताजवळ सध्या ५.३३ दशलक्ष मेट्रीक टन म्हणजे ७० दिवसांचा स्ट्रेटजिक ऑईल रिझर्व्ह आहे. हा तेल साठी अंडरग्राऊंड टाक्यांमध्ये ठेवण्यत आला आहे. ब्रिटनच्या जवळ सुमारे ६० – ७०० दशलक्ष बॅरल आणि स्पेन आणि नेदरलँड सारख्या देशांकडे देखील ३० ते ५० दशलक्ष बॅरल राखीव इंधनसाठा आहे. वाढत्या इंधन संकटामुळे आता अनेक छोटे देश देखील इंधनाचा राखीव साठा करुन ठेवू लागले आहेत.

Follow Us
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी