
सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत, ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट आहे. जेनिफर विंगेट हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असं जेनिफर विंगेट हिचं सौंदर्य आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत जेनिफर विंगेट हिने चाहत्यांच्या मनात घर केलं.

वयाच्या १२ व्या वर्षापासून अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ‘राजा को रानी से प्यार हो गया’ मालिकेच्या माध्यमातून जेनिफर पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीस आली. आज अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्री फक्त तिच्या प्रोफेशनल नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील असते चर्चेत.

मालिकाच्या सेटवरच जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2012 मध्ये जेनिफर आणि करण यांनी लग्न केलं. मात्र, दोघांचं नातं फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले.

करण सिंग ग्रोव्हर याच्यापासून विभक्त झाल्यानंतर जेफिनरने दुसरं लग्न केलं नाही. अभिनेत्री मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर अभनेता करण सिंग ग्रोव्हर याने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं.