
कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झाल्याने यंदा दिवाळी सण सगळीकडे उत्साहात साजरी होत आहे. कलाकारांसाठी देखील ही दिवाळी उत्साहवर्धक आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि कोरोना मधील नैराश्य दूर करण्यासाठी सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगांवकर आपल्या रसिकांसाठी एक खास सांगीतिक मेजवानी आणली आहे.

"उजळे पणती" हे दिवाळीच अत्यंत सुंदर वर्णन करणारं गाणं घेऊन मंगेश रसिकांसमोर आला आहे. या गीताची रचना डॉ रामेश्वरी अल्हाबादे यांची असून संगीत तरुण संगीतकार मिहीर थत्ते यांचं आहे. मंगेशचा प्रसन्न व गोड आवाज या गीताचे सौंदर्य अजून खुलवतो.

दिवाळीच्या फराळासोबत मंगेश बोरगावकरच्या ‘उजळे पणती’ने ही दिवाळी गोड होणार अशी दाद श्रोत्यांकडून मिळत आहे. हे गाणं सर्व म्युझिक पोर्टल्सवर व यूट्यूब वर ही याचा सुंदर व्हिडिओ उपलब्ध आहे.

मंगेशने या गाण्याचे पोस्टर त्याच्या सोशल मिडियावर शेअर केले आहे. त्यासोबत जळे पणती हरला अंधार..दिवाळसण हा भुलवी फार..!❤️गुलाबी थंडीला उटण्याचा स्पर्श. आली ती पहाट छेडीत मल्हार..सुगंधी श्वास हा झिरपे मनांत वाऱ्यात त्या जणू सांडले अत्तर..! दिवाळी!!?आपल्या आवडत्या सणाचं सहज सुंदर वर्णन केलेलं हे गोड गाणं खास आपल्यासाठी..!!??असे कॅप्शन दिले आहे.