रसिका सुनिलचा लेट पण थेट व्हॅलेंटाईन डे!, फोटो शेअर करत म्हणाली…

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 16, 2022 | 1:02 PM
1 / 5
अभिनेत्री रसिका सुनिलने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाईन डेनिमित्त फोटो शेअर केले आहेत. हातात गुलाबाची फुलं घेऊन काढलेले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री रसिका सुनिलने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हॅलेंटाईन डेनिमित्त फोटो शेअर केले आहेत. हातात गुलाबाची फुलं घेऊन काढलेले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5

रसिकाने या फोटोला तिने तितकंच सुंदर कॅप्शन दिलं आहे. "आदित्य, तू मला पाठवून मला impress केलं आहे. या फुलांसोबत तुझ्या शुभेच्छाही फुलांइतक्याच सुंदर आहेत. असा माझा दिवस खास करणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे याचं समाधान आहे. आदित्य माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.", असं रसिका तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली आहे.

3 / 5

रसिकाने मागच्या वर्षी 18 ऑक्टोबरला तिचा बॉयफ्रेंड आदित्यसोबत लग्न केलं. या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते.

4 / 5

रसिका आपला पती आदित्यसोबत नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

5 / 5

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया या पात्राने रसिकाला घराघरात पोहोचवलं. रसिकावर प्रेम करणारा मोठा चाहता वर्ग आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us