
अभिनेत्री अभिज्ञा भावेने नुकतंच काही खास फोटो शेअर केलेत. तिने काश्मीर ट्रिपचे फोटो अभिज्ञाने शेअर केलेत. बर्फाळ प्रदेशात इन्जॉय करतानाचा अभिज्ञाचे हे फोटो...

खास कॅप्शन देत अभिज्ञाने काश्मीर ट्रिपचे फोटो शेअर केलेत. या हसण्यामागचा थरकाप तुम्हाला जाणवतोय का? असं कॅप्शन देत अभिज्ञाने काश्मीरमधील हे खास फोटो शेअर केलेत.

नुकतंच अभिज्ञाचा वाढदिवस झाला. हा खास दिवस सेलिब्रेट करण्यासाठी अभिज्ञा तिच्या पतीसोबत खास ट्रिपवर गेली होती. अभिज्ञा आणि तिचा पती मेहुल पै काश्मीरमध्ये ट्रीपसाठी गेले होते.

माझी सुंदर क्राईम पार्टनर... तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे. तू माझ्यासाठी खास आहेस. आपण दोघे एकत्र ज्या अतुलनीय प्रवासावर आहोत ते साजरे करण्यासाठी इथे आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा..., असं म्हणत मेहुलने काश्मीरमधून अभिज्ञासाठी खास पोस्ट लिहिली होती.

सूर्यप्रकाश आणि हसू, सर्वकाही नैसर्गिक!! खूप मजेदार, खूप प्रयत्न आणि सरावानंतर मी या खेळाच्या प्रेमात पडलो. मला बर्फावर स्केटिंग करायला आवडू लागलंय. मला कधी संधी मिळाली तर मी जरूर हे शिकून घेईल माझ्या बकेट लिस्टवर आणखी एक टिक झाली, असं म्हणत अभिज्ञाने काश्मीरमधील फोटो शेअर केलेत.