प्राजक्ता माळीने उघडपणे सांगितलं ब्रेकअपचं कारण; तो वारंवार माझ्याशी…
Marathi Actress Prajaktta Mali Lovestory : अभिनेत्री प्राजक्ता माळी होती 'त्या' व्यक्तीच्या प्रेमात, पण मग... ; प्राजक्ताने तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. आता प्राजक्ता माळीचे प्रेमाबाबतचे सध्याचे विचार काय? ती तिच्या पार्टनरकडून कोणत्या अपेक्षा ठेवते? वाचा सविस्तर...

अभिनेत्री प्राजक्ता माळी... मराठीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक... प्राजक्ताचा सालस अभिनय रसिकांना भावतो. मालिका सिनेमांमधील तिच्या भूमिकांना सिनेरसिकांची पसंती मिळते.

सिने रसिकांना प्राजक्ताचा अभिनय जितका भावतो, तितकंच तिची मतंही ऐकायला आवडतात. वेगवेगळ्या विषयांवर प्राजक्ता तिची मतं व्यक्त करत असते.

प्रेम, साथीदार आणि ब्रेकअपबद्दल प्राजक्ता माळी एका मुलाखतीदरम्यान बोलती झाली. तिचं ब्रेकअप नेमकं कोणत्या कारणाने झालं? यावर प्राजक्ता उघपणे बोलली आहे.

पाच वर्षांपुर्वी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात होती. मात्र तो खोटं बोलत असल्याने ब्रेकअप झाल्याचं प्राजक्ताने सांगितलं. तू वारंवार माझ्याशी खोटं बोलतो. मी तुला पकडलेलं आहे. हे त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे त्याला मी रितसर जय महाराष्ट्र केला, असं प्राजक्ताने सांगितलं.

आता माझ्या आयुष्यात काही लोक येतात. मी प्रेमात पडते. मात्र मला वाटतं हा शेवटपर्यंत नसणार आहे. मग मी त्याला सांगते, एक मित्रा... सगळं छान आहे. पण हे प्रॉब्लेम आहेत. तर घरी जा..., असं प्राजक्ता म्हणाली.