
अभिनेत्री नोरा फतेही हिने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, डान्स आणि लूकमुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे. काळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

कोणत्याही लूकमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. नोरा हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे.