
बॉलिवूड अभिनेता सिकंदर खेर आज त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री किरण खेर आणि अनुपम खेर यांचा तो मुलगा आहे. सिकंदर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत आहे. जरी तो त्याच्या पालकांसारखा प्रसिद्ध झाला नाही तरी त्याने चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

सिकंदर अनेकदा त्याचे वडील अनुपम खेर यांच्यासोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने डेहराडूनच्या दून स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून सहा महिन्यांचा थिएटर कोर्स केला.

सिकंदर खेरने सहदिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. 'दिल तो पागल है' आणि 'देवदास'मध्ये त्याने सहदिग्दर्शकाची भूमिका साकारली आहे. त्याला पहिला ब्रेक हंसल मेहताच्या 'वुडस्टॉक व्हिला' चित्रपटातून मिळाला. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण त्याचा अभिनय लोकांना आवडला.

सिकंदर 'खेले हम जी जीने जान से', 'औरंगजेब', 'तेरे बिन लादेन 2', 'मिलन टॉकीज' आणि 'झोया फॅक्टर'सह अनेक चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. पण या चित्रपटांचा त्याला फारसा फायदा झाला नाही.

चित्रपटांव्यतिरिक्त सिकंदर छोट्या पडद्यावरही दिसला. अभिनेता '24' आणि 'सेन्स 8' मध्ये दिसला आहे. याशिवाय सुष्मिता सेनच्या 'आर्या' या वेब सीरिजमध्येही तो दिसला.