
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची नांदी झाली आहे. 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर पार पडला आहे. दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसले आहेत.

‘बिग बॉस मराठी 3’च्या आलिशान घरात राहण्यासाठी आता स्पर्धक पोहोचले आहेत. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री गायत्री दातार.

‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री गायत्री दातार ‘बिग बॉस 3’च्या घरात जाणार अशी गेले अनेक दिवस चर्चा होती. आता ग्रँड प्रिमिअर सुंदर डान्स परफॉर्मंस देत गायत्रीनं या घरात प्रवेश केला आहे.

मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा अर्थात अभिनेत्री गायत्री दातारनं 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या ईशाला प्रेक्षकांनीसुद्धा भरभरुन प्रेम दिलं आहे.

गायत्री गेले अनेक दिवस तिच्या नवनवीन फोटोशूट्समुळे सुद्धा चर्चेत होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होती.

गायत्रीचा जन्म 30 जुलै, 1993 मध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर प्रवेश केला. अभिनय आणि मॉडेलिंग शिवाय गायत्रीला ट्रेकिंग आणि गार्डनिंगची आवड आहे.

आता साधी भोळी दिसणारी गायत्री बिग बॉसच्या घरात आपली जागा कशी निर्माण करते हे पाहण्या सारखं असणार आहे.