
अजय देवगण आणि काजोल यांची लेक निसा देवगण ही नेहमीच चर्चेत असते. निसा देवगण हिने अजून बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले नाहीये. मात्र, असे असताना देखील तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

निसा देवगण ही नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वी पार्टीतून बाहेर पडतानाचा निसा देवगण हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये निशा हिला चालता देखील येत नव्हते.

नुकताच निसा देवगण हिने जोरदार पार्टी केलीये, ओरहान अवात्रामणि याच्यासोबत पार्टीत धमाल करताना निसा देवगण ही दिसत आहे. आता या पार्टीतील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या पार्टीमध्ये निसा देवगण ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. एका फोटोमध्ये गाडीमध्ये ओरहान अवात्रामणि आणि निशा देवगण हे दिसत आहेत. आता हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

आता व्हायरल होणाऱ्या या फोटोमुळे निशा देवगण हिला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी थेट निशा देवगण हिला पिदाडी देखील म्हटले आहे. पार्टीमध्ये फुल नशेमध्ये निशा देवगण ही दिसत आहे.