
प्रियांका चोप्रा परदेशात राहते. मात्र ती पूर्ण देसी गर्ल आहे. ती तिथे सर्व भारतीय सण साजरे करते. आता प्रियांकाने दिवाळीच्या मुहूर्तावर निकसोबत लक्ष्मीपूजन केले. हे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोमध्ये निक देखील मोठ्या भक्तिभावाने पूजा करताना दिसत आहे. यादरम्यान प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी घातली होती आणि निकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला दिसत आहे.

फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम.

यावेळी प्रियांकाने मंगळसूत्र देखील घातले होते आणि तिचा देसी लूक एकदम जबरदस्त दिसत आहे.

प्रियांकाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची द व्हाइट टाइगर या चित्रपटात दिसली होती.