
ऐश्वर्या बच्चन, करिश्मा कपूर, करीना कपूर आणि माधुरी दीक्षित यांसारख्या अनेक अभिनेत्रींसह बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटीजचे अनेक लूकअलाईक आहेत. काही काळापूर्वी प्रियांका चोप्रासारखी दिसणाऱ्या एका मुलीची खूप चर्चा झाली होती. ही मुलगी हुबेहूब प्रियांका सारखी दिसत आहे.

अमायरा डोंगरे असे या मुलीचे नाव असून, ती सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. अमायरा अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रियांका चोप्राच्या चित्रपटातील लूक ट्राय करत असते.

अमायराचे लवकरच इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्स होणार आहेत. अमायराचे दिसायला हुबेहूब प्रियांकासारखीच आहे.

अमायराने प्रियांका चोप्राच्या लूकचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून युजर्स तिला म्हणतात की, तुम्ही अगदी प्रियांका चोप्रासारखे दिसता.

जर, प्रियांका चोप्रा तिचा हा लूक बघेल, तर कदाचित ती स्वतः देखील फसू शकते की ती कोणत्याही आरशासमोर तर उभी राहिली नाही ना....