
अभिनेत्री गौतमी देशपांडे ही लग्नगाठ बांधणार आहे. गौतमीचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

गौतमीच्या मेहंदीचे फोटो तिची बहीण मृण्मयी देशपांडे हिने शेअर केलेत. गौतमीच्या मेहंदीचे फोटो शेअर केलेत.

गौतमी देशपांडे हिचा होणारा नवरा नक्की कोण आहे? याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तर गौतमीचा होणार पती स्वानंद तेंडुलकर हा डिजीटल क्रिएटर आहे.

स्वानंद हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. त्याच्या व्हीडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. स्वानंद प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल भाडिपासोबत काम करतो.

गौतमी आणि स्वानंद उद्या लग्नगाठ बांधत आहेत. त्यांच्या मेहेंदीचे फोटो समोर आलेत. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.