
रजनीकांत यांचा चाहता कार्तिक याने तामिळनाडू याठिकाणी अभिनेत्याचं मंदिर उभारलं आहे. मंदिरात चाहत्याने तब्बव 250 किलोग्रॉमची रजनीकांत यांची मुर्ती तयार केली आहे.

सध्या रजनीकांत यांच्या मंदिराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. थलायवा यांच्या मंदिरात पूजा अर्चा आणि होम हवनही करण्यात येत. पारंपरिक पद्धतीत मंदिरात रजनीकांत यांची पूजा करण्यात येते.

रजनीकांत यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच 'जेलर' सिनेमाच्या माध्यमातून रजनीकांत चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. सिनेमा जवळरास 600 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 'थलायवर 170' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते अमिताभ बच्चन देखील असणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून रजनीकांत चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. रजनीकांत यांच्यानंतर अनेक अभिनेत्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं. पण आजपर्यंत रजनीकांत यांची इंडस्ट्रीमधील जागा कोणी घेऊ शकलेलं नाही.