
अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भीड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाची टिम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी राजकुमार रावने काही चित्रपटाच्या सेटवरील किस्से सांगितले आहेत.

भीड या चित्रपटात भूमी पेडणेकर, राजकुमार राव, आशुतोष राणा, कृतिका कामरा हे स्टार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे.

चित्रपटाच्या शूटिंगवेळी राजकुमार रावला रिअलमध्ये आशुतोषने कानाखाली मारली. याचा किस्सा सांगताना कपिल शर्मा याच्या शोमध्ये राजकुमार राव दिसला.


भीड हा चित्रपट लॉकडाऊनवर आधारित आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात कशाप्रकारचे बदल झाले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.