
राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत हिने तिच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना मोठा धक्का दिला.

राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, त्यानंतरच ती प्रचंड चर्चेत आलीये. लग्न होऊन काही दिवस झाले असतानाच राखी सावंत हिने अनेक गंभीर आरोप हे आदिल दुर्रानी याच्यावर केले.

आदिल दुर्रानी आता सध्या कोठडीमध्ये आहे. मात्र, हे सर्व सुरू असतानाच राखी सावंत ही थेट दुबईला पोहचली आहे. राखी सावंत नुकताच मुंबई विमानतळावर स्पाॅट झाली होती.

राखी सावंत हिने दुबईला जाण्याचे कारणही सांगून टाकले आहे. राखी सावंत ही दुबईमध्ये अभिनय अकादमी ओपन करणार आहे. आयुष्यामध्ये अनेक घडामोडी घडत असताना राखी थेट दुबईला गेलीये.
