
सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर आंतरिक सौंदर्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हा विचार घेऊन ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड जवळची वाटू लागली. अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात मालिकांचं एक वेगळं स्थान असतं. कालांतरानं आवडत्या मालिका आवडते कलाकार त्यांच्या आयुष्यात होणारे बदल आपलेसे वाटायला लागतात.आपल्या आवडत्या मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकालाच असते.

आता मालिकेत दीपानं दोन मुलींना जन्म दिला आहे. मात्र तिची एक मुलगी तिच्यापासून दुरावली आहे.

तर दुसऱ्या लेकीला कार्तिक आपलं मानायला तयार नाहीये. त्याच्या म्हणण्यांनुसार ती मुलगी त्याची नाहीये. आता दीपा एकटीच या मुलीची जबाबदारी पार पाडणार आहे. त्यामुळे आता दीपाच्या आयुष्यात नेमकं काय वळण येणार हे पाहण्यासारखं असणार आहे.

आता मात्र कार्तिक एका बाळाची काळजी घेऊ लागल्याचं दिसतंय. नवकळत का होईना तो बाळाची काळजी करायला लागला आहे.

मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे राधाईला आई मानत तिनं ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्तिक तिच्या आयुष्यात आला आणि सर्वस्व झाला. आता ही मालिका कोणतं वळण घेणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.