
बॉलिवूड अभिनेता आणि टीव्हीचा प्रसिद्ध होस्ट मनीष पॉलनं नुकतंच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. कोरोनामुळे मनीषने यावेळी आपला वाढदिवस आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मीडिया फोटोग्राफर्सनीही मनीष पॉलचा वाढदिवस साजरा केला.

मनीष पॉलच्या वाढदिवशी फोटोग्राफर्सनी चॉकलेट केक आणला होता, मनीषनं त्याच्या इमारतीखाली तो केक कापला.

या दरम्यान, मनीषनं फोटोग्राफर्सला काही रिटर्न गिफ्ट्स देखील दिले.

मनीष पॉलने फोटोग्राफर्ससाठी अतिशय शांतपणे पोझ दिल्या. तो खूप आनंदी दिसत होता.

मनीषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच बॉलीवूडच्या 'जुग जुग जिओ' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मनीष व्यतिरिक्त वरुण धवन आणि नीतू कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.