
बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. सैफ अली खान हा फक्त त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची लव्ह स्टोरी कोणापासूनच लपवून राहू शकली नव्हती.

अमृता सिंह आणि सैफ अली खान हे काही वर्षांपूर्वी एका शोमध्ये आले होते. यावेळी सैफ अली खान याने सांगितले की, मी अमृता सिंहला माझ्या घरी डिनरसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी नकार दिला आणि मला तिच्या घरी डिनरला बोलावले.

मी ज्यावेळी अमृता सिंहच्या घरी गेलो आणि तिला बिना मेकअपचे बघितले तेंव्हा मी तिच्या प्रेमात पडलो. विशेष म्हणजे डिनरसाठी गेल्यानंतर तब्बल दोन दिवस मी अमृता सिंहच्या घरी राहिलो. त्यावेळी आम्ही एकमेकांना वेळ दिला आणि जाणून घेतले.

पहिल्याच भेटीमध्ये सैफ अली खान हा अमृता सिंहच्या घरी दोन दिवस राहिला होता. 2004 मध्ये अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला. अमृता सिंह ही सैफ अली खान याच्यापेक्षा 12 वर्ष मोठी होती.

अमृता सिंह आणि सैफ अली खान यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या मुलीचे नाव सारा अली खान तर मुलाचे नाव इब्राहिम अली खान असे आहेत.