
भारतत जन्मलेल्या सलमान रश्दी यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. त्यांच्या कादंबरीमुळे प्रत्येकजण त्यांना ओळखतात. सलमान रश्दी आता अमेरिकेचे नागरिक आहे. त्यांच्या कादंबरीसाठी ते बर्याच वेळा चर्चेत राहिले आहेत. त्यांची प्रत्येक कादंबरी चर्चेचा एक भाग बनली आहे. सलमान रश्दी यांच्या कादंबरीवर चित्रपटही बनला आहेत. आज त्यांच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला ‘त्या’ चित्रपटांबद्दल सांगणार आहोत...

सलमान यांच्या ‘मिडनाईट चाईल्ड’ या कादंबरीवर आधारित एक चित्रपट बनला होता. त्यांच्या या कादंबरीला बुकर पुरस्कारही मिळाला आहे. हा चित्रपट अशा एका व्यक्तीची जीवन कहाणी सांगतो, ज्याचा जन्म त्या रात्री झाला होता, ज्या दिवशी देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाले होते.

‘मिडनाईट चिल्ड्रन’ भारतात 1 फेब्रुवारी 2013 रोजी रिलीज झाली होती. या चित्रपटाचा स्क्रीन प्ले भारतात स्वतः सलमान रश्दी यांनी केला होता.

‘मिडनाईट चिल्ड्रन’मध्ये शबाना आझमी, श्रेया सरन, शहाना गोस्वामी, कुलभूषण खरबंदा, सीमा विश्वास मुख्य भूमिकेत दिसले होते.

सलमान रश्दी यांच्या कादंबरीप्रमाणेच त्यांचा चित्रपटही चांगलाच गाजला होता.