
सारा अली खान हिने गजराती लुकमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

सांगायचं झालं तर अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या मेहेंदी सोहळ्यात साराने खास लूक केला होता. जो चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे.

अभिनेत्री सारा अली खान हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खुद्द अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर देखील सारा कायम सक्रिय असते. सारा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिच्या रोजच्या आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

साराचा स्वभाव देखील चाहत्यांना प्रचंड आवडतो. साराची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांसोबत देखील अभिनेत्री फोटो आणि सेल्फी क्लिक करत असते.