
बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’ या सिनेमातून केली. त्यानंतर सयानी हिने कधी मागे वळून पाहिलं नाही. आज अभिनेत्री तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आली आहे.

सयानी गुप्ता (Sayani Gupta) तिच्या वेगळ्या व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाते. सयानी गुप्ता हिचा जन्म 9 ऑक्टोबर 1985 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. 'आर्टिकल १५', 'मार्गरिटा विद ए स्ट्रॉ' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे.

सयानी गुप्ता अभिनेता शाहरुख खान याच्या 'फॅन' सिनेमात देखील अभिनेत्री झळकली. सयानी गुप्ताने ‘जॉली एलएलबी 2’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘फोर मोअर शॉट्स’सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. अभिनेत्री फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील सक्रिय असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सयानी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.