12th Marksheet | शाहरुख खान ते अनुष्का शर्मा, तुमच्या लाडक्या बॉलिवूडकरांना 12वीत किती टक्के मिळालेत माहितीये का?

| Updated on: Sep 01, 2021 | 7:35 AM

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयामध्ये केवळ आपला लौकिक पसरवला नाही तर ते अभ्यासातही नेहमी अव्वल राहिले आहेत. चला तर आपल्या लाडक्या कलाकारांनी 12वी बोर्डाच्या परीक्षेत किती गुण मिळवले ते जाणून घेऊया...

1 / 8

2 / 8
शाहरुख खान, ज्याला बॉलिवूडचा 'किंग खान' म्हटले जाते, तो केवळ अभिनय क्षेत्रातच सर्वोत्तम नाहीये, तर शाहरुख अभ्यासाच्या बाबतीतही खूप हुशार होता. शाहरुख खानने बारावीत 80.5% गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या हंसराज कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर शाहरुखने जामिया मिलिया इस्लामियामधून मास कम्युनिकेशनसाठी प्रवेश घेतला, पण काही कारणांमुळे त्याला ते मध्यातच सोडावे लागले. शाहरुख खानचा नेहमीच असा विश्वास आहे की, करिअर कोणत्याही क्षेत्रात केले तरी त्याचा अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे. तो आपल्या तीन मुलांच्या शिक्षणाकडेही खूप लक्ष देतो.

3 / 8
आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे, बी-टाऊनच्या अव्वल अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झालेली अभिनेत्री क्रिती सॅनन अभ्यासाच्या बाबतीत खूप चांगली झाली आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षेत तिने 90% गुण मिळवले होते. यानंतर तिने जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (नोएडा) मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पदवी पूर्ण केली. परंतु मॉडेलिंगकडे कल वाढल्यानंतर तिने ग्लॅमर जगतात आपले करिअर निवडले.

4 / 8
अभिनेत्री अनुष्का शर्मा, जिची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते, तिला 12 वी बोर्डात 89% गुण मिळाले आहेत. अनुष्का शर्मा सध्या तिचा पती विराट कोहली (भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार) आणि मुलगी वामिकासह प्रवासात व्यस्त आहे. पण दररोज ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आपली झलक दाखवत असते.

5 / 8
श्रद्धा कपूर त्या प्रतिभावान बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या केवळ अभिनयानेच नव्हे तर गायनानेही चाहत्यांची मने जिंकली. कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी श्रद्धा अभ्यासात उत्कृष्ट विद्यार्थिनी राहिली आहे. तिने बोर्डाच्या परीक्षेत 95% टक्के गुण मिळवले होते.

6 / 8
‘धडक’ फेम अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या सुपर अभिनय कौशल्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप सोडली आहे. जान्हवीने इंटरमीडिएट परीक्षेत 85% गुण मिळवले होते.

7 / 8
बॉलिवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्रींना आपल्या अभिनयाने पराभूत करणाऱ्या अभिनेत्री भूमी पेडणकरने 12 वी मध्ये 83% गुण मिळवले होते. मात्र, काही कौटुंबिक समस्यांमुळे तिला लवकर शिक्षण सोडावे लागले. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होती. पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता.

8 / 8
अलीकडेच, दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नगाठ बांधलेली यामी गौतम बरीच चर्चेत आहे. यामीने तिच्या अभिनयाने मोठ्या पडद्यावर बरीच प्रशंसा मिळवली आहे. तिच्या अभ्यासाबद्दल बोलताना, यामीला 12वीमध्ये 80% गुण मिळाले होते.