
'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला तिच्या चाहत्यांची मनं जिंकत असते. याच कारणामुळे ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि सतत वेगवेगळ्या फोटोशूटद्वारे तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करते. आता तिने फ्लोरल पिंट बिकिनीमध्ये काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

आता तिने सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून लोक पुन्हा एकदा तिची स्तुती करत आहेत.

फोटोंमध्ये शेफाली स्विमिंग पूलमध्ये आश्चर्यकारक पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.

या फोटोंमध्ये शेफालीने मोनोकिनी (बिकिनी) घातली आहे. त्यावरील फ्लोरल प्रिंट शेफालीचं सौंदर्य वाढवत आहे. फोटो शेअर करताना शेफालीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'बीट द हीट', म्हणजेच उष्णतेवर मात करा. हे कॅप्शन तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

2002 मध्ये 'कांटा लगा ...' हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला तेव्हा शेफाली जरीवाला प्रसिद्धीझोतात आली. तिचं हे गाणं अजूनही प्रसिद्ध आहे आणि लोकांच्या जिभेवर खूप लवकर येते. या गाण्यानंतर ती इंडस्ट्रीमध्ये आली आणि तिनं 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात भूमिका साकारली.