
आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर यांच्यात एक सामना होता ज्यात चेन्नईच्या संघानं हा सामना गमावला. सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या वेगवान गोलंदाजाने त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केलं. त्याच्या या खास क्षणाचे व्हिडीओ आणि फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. दीपकची गर्लफ्रेंड जया खूप सुंदर आहे, पण दीपकच्या बहिणीलासुद्धा सौंदर्याच्या बाबतीत तोड नाही. तिचे काही फोटो पाहूया.

मालती चहर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा अनेक हॉट फोटो शेअर करते. एवढंच नाही तर मालती कधी कधी तिच्या भावासोबत चांगले फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

दीपक चहरची बहीण मालती देखील सीएसकेची मोठी चाहती आहे आणि सीएसके सामन्यांदरम्यान अनेकदा टीमला पाठिंबा देताना ती दिसते.

जेव्हा दीपक चहरने आपल्या प्रेयसीसाठी संपूर्ण जगासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं, तेव्हा त्याची बहीण मालतीनंही सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन केलं. भावाच्या या निर्णयामुळे मालती खूप खूश झाली.

सोशल मीडियावर लाखो लोक दीपकची बहीण मालती चहरला फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर सध्या तिचे 595k फॉलोअर्स आहेत.