
अभिनेत्री तमन्ना भाटिया (tamanna bhatia) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्या दिलखेच अदांवर फक्त चाहतेच नाही तर, बॉयफ्रेंड विजय वर्मा देखील फिदा झाला आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साऊथ आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री चाहत्यांना कायम गोल्स देत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा आहे.

तमन्नाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

फॅशनसोबतच अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. अभिनेत्रीचं नाव अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत जोडण्यात येत आहे. दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली आहे.